दवबिंदू

दवबिंदू तो बसला होता…
पानाला चिकटून…
अर्थ मला आयुष्याचा…
गेला तो सांगून…

उमेद त्याची जगण्याची…
अन अफाट पाहून चिकाटी …
मरगळलेल्या मनास मिळाली…
उभारी परतून…

मैत्रीण त्याची पालवी कोवळी…
होती देत धीर समजावी…
फुलवत होती आशावाद …
घट्ट त्यास पकडून…

भले असेल आयुष्य छोटे…
पचवले अनेक…
वारे वादळी मोठे…
बदलवले सप्तरंगात उष्ण तप्त ते ऊन….

स्वच्छ निर्मळ मन त्याचे…
भले असेल आयुष्य क्षणाचे …
अर्थ तयाचा मम हृदयासी …
गेला तो स्पर्शून…

दवबिंदू तो बसला होता…
पानाला चिकटून…
अर्थ मला आयुष्याचा…
गेला तो सांगून…

जयंत प्र. पोतदार

PC: Bhagyashri Vartak

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s